साहित्य संमेलन की अकारण वादाचे आकांडतांडव
================================
साहित्यिकांचे संमेलन म्हणजे काव्यगायन, परस्पर प्रशंसा नाहीतर अकारण वादाचे आकांडतांडव आणि उथळ विचारांची खैरात असा प्रकार झाला असल्यामुळे , संमेलनातून भरीव कार्यनिष्पत्ती होत नाही याचे आश्चर्य करावयास नको .
जागृतिकार पाळेकर
सहा जानेवारी 1945
धुळे येथे 1945 मध्ये भा वि वरेरकरांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या साहित्य संमेलनावरची ही प्रतिक्रीया सत्तर वर्षानंतर भरणा-या अखिल भारतीय साहित्य संमेलनांना आजही लागू पडते . तत्कालीन महनीय व्यक्तिंनी अध्यक्षस्थान भूषविल्याने अध्यक्षीय भाषणांना एक दर्जा तरी होता .बेळगाव येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात ग. ञ्यं. माडखोलकर यांनी संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचे प्रतिपादन अत्यंत तळमळीने केले होते . तरी विदर्भ साहित्य संघाच्या रौप्य महोत्सवी साहित्य संमेलनास या , असा वि. भि. कोलते यांनी आग्रह केल्यावर भाऊसाहेब माडखोलकर म्हणाले होते , " मी मुळीच येणार नाही . तुमचे संमेलन होणार म्हणजे काय होणार ? तोच अश्लिल वाऽमयाचा प्रश्न , कला की जीवन या संबधीची चर्चा , काव्यगायन आणि काही कंटाळी स्वरूपाचे ठराव , हेच की नाही? असल्या कामात खर्च करायला माझ्याजवळ मुळीच वेळ नाही. मी संमेलनाला मुळीच येणार नाही . " (अजुनि चालतोची वाट )संमेलनाचे विषय साठोत्तरी , नव्वदोत्तरी झाले . बाकीचे सर्व सवंगपणे चालू आहे . या महामराठी उत्सवाचे आकडे माञ कोटीच्या घरात गेले आहेत .
मंञी , लोकनेत्यांची संमेलनातील उपस्थिती हा अलिकडचा लाडका विषय . पण राज्यसत्तेचा आर्थिक आधार मागायचा आणि मंञ्यांची टवाळी करायची हे दिवस कालबाहय झाले आहेत . महाराष्ट्रात पुरस्कार वापसीला कसा प्रतिसाद मिळाला हे आपण पाहिले आहे . उत्सवप्रियता हे मराठी माणसाचे लक्षण लक्षात घेतले तर संमेलने संपन्न होत रहाणार आणि त्याविषयीच्या उथळ चर्चाही होत रहाणार . माध्यमांचा विस्तार झाल्याने ते अटळ आहे . नगरचे संमेलन गाजले ते निषेधाचा ठराव करणार की नाही , या विषयावरून . नाशिकचे संमेलन लक्षात राहीले बोकड बळी दिला की नाही ? या अप्रस्तुत मुद्यावरून . ठाण्याचे संमेलन चर्चेत आले नथुरामच्या मुद्यावरून . चिपळूनच्या संमेलनात दिंडीवरून चर्चा झाली . सासवडला म्हणे अध्यक्षांनी भाषणाच्या प्रतीच भिरकावल्या . असाहित्यिक मुद्यावरूनच साहित्य संमेलने लक्षात रहातात .पिंपरी चिंचवडचे संमेलनच रद्द करा इथ पर्यत चर्चा आली आहे .
मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावर काही महत्वपूर्ण विषयाची चर्चा व्हावी , अशी अपेक्षा असते . अध्यक्षांचे भाषण हे या दृष्टीने दिशादर्शक ठरावे . पण मागील काही संमेलनांच्या अध्यक्षीय भाषणांकडे नजर टाकल्यास सगळीच आबाळ दिसून येते . अध्यक्षीय भाषणात साहित्य व्यवहार व साहित्य विचारावर , समाजविचारावर चर्चा होणे अपेक्षित असते . पण तसे घडत नाही . निवडून येताना झालेल्या दमछाकीचेच प्रतिबिंब भाषणात पडते . सर्वांनाच सांभाळून घेण्याची भूमिका असते . हम भले , तुम भले , सब भले पध्दतीने काही विचार परंपरा , साहित्य प्रवाह , नवा लेखक , नवे समाज वास्तव यावर भाष्य अथवा समीक्षात्मक मांडणी काही होत नाही . काहींनी तसा प्रयत्न केला तर तो समजून घेतला जात नाही . कराडच्या साहित्य संमेलनाचे उदघाटक होते माजी पंतप्रधान नरसिंहराव . त्यांनी अस्खलीत मरठीत भाषण करताना भरताच्या रससिध्दांता पलिकडे आपण फार प्रगती केली नाही असे स्पष्ट करून भारतीय साहित्य परंपरेतील मराठी साहित्याच्याही वाटचालीचा धांडोळा घेतला होता . ते भाषण खूपच गाजले . घुमानला संमेलनाध्यक्षांना फार अवकाश मिळाला नाही . तरी डाॅ सदानंद मोरे यांनी संत साहित्याच्या पृष्ठ भूमीवर पंडीती साहित्याच्या परंपरेवर नेमके प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते . पण ते भाषण कुणी फार गांभिर्याने घेतले नाही की त्याची समीक्षाही झाली नाही .
साहित्य संमेलनाचा सोहळा संपन्न होईल . तो होऊ द्या . पण विचार परंपरांची प्रगती त्यात दिसू द्या . अन्यथा अध्यक्षीय भाषणांचे वैभवशाली दिवस इतिहास जमा होवून साहित्य जञा भरली आणि सरली अशीच नोंद पिंपरी चिंचवडच्या साहित्य संमेलनाची नोंद इतिहासात होईल आणि एक विक्षिप्त माणूस वलयांकित झाला असे म्हटले जाईल . तसे होऊ नये , महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेचे दर्शन तिथे घडावे . अन्यथा जागृतिकार पाळेकरांनी म्हटल्याप्रमाणे , अकारण वादाचे आकांडतांडव आणि उथळ विचारांची खैरात यामुळेच हे संमेलनही लक्षात राहील .

No comments:
Post a Comment