बहुभाषिक संमेलन घुमान ( पंजाब )
बहुभाषिक साहित्य संमेलन पंजाब प्रांतातल्या घुमान येथे सुरू झाले आहे . अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ही उपलब्धी मानावी लागेल . अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने उत्सवी होऊ लागली आहेत . हा उत्सव काळानुरूप आणि आयोजक संस्थेच्या ताकदी नुसार अधिकाधिक हायटेक होऊ लागला आहे .पिंप्री चिंचवडचे संमेलन हे त्याचे ताजे उदाहरण . सरहदने आठ्ठयाऐशीवे संमेलन यशस्वी करून दाखविले . ते घुमानला घेण्यातले औचित्यही मांडले . पंजाब- महाराष्ट्रातला अनुबंध स्पष्ट झाला . संमेलनाध्यक्षांनी तर " पुंडलिक वरदा हरी विठ्ठल " या वचनाचा विस्तार " ज्ञानदेव नामदेव तुकाराम " असा केला . डाॅ सदानंद मोरे यांचे घुमानचे अध्यक्षीय भाषण मराठे आणि शीख यांचा अनुबंध स्पष्ट करणारे होते . भक्ती आणि शौर्य याची मांडणी त्यांनी केली होती , पण उत्सवीपणाच्या झगमगाटात ते भाषण दुर्लक्षित राहीले . तरी या संमेलनाने भाषिक संस्कृतीला नवा आयाम दिला .
साहित्य संमेलने आणि वाद काही नवे नाही . बहुभाषिक साहित्य संमेलन आतापर्यंत त्यापासून दूर आहे . कारण हे संमेलन उत्सवी नाही . भाषिक आदान प्रदान , भाषासंवर्धन आणि अनुवाद रुपांतर , भाषिकसबंध यावर चर्चा होणार आहे . मागच्या वेळी महाराष्ट्रातून खास दोन रेल्वेने महाराष्ट्रीय मडळी गेली होती . यावेळी लवाजमा घेऊन कुणी जाणार नाही . महाराष्ट्रातील निवडक मडळी या दोन दिवसाच्या संमेलनात सहभागी होत आहेत .भारत देसरडा , संजय नहार यांचे बरोबरच कथाकार राजन खान निमंञक आहेत . तर अरुण नेवासकर स्वागताध्यक्ष आहेत . अरुण नेवासकरांनी घुमानच्या संमेलनासाठी मोठे योगदान दिले होते . हे संमेलन यशस्वी व्हावे यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत . कार्यक्रम पञिकेत माध्यमातील मंडळी मोठ्या प्रमाणात आहेत .विजय कुवळेकर , राजीव खांडेकर , सुरूश भटेवरा , विजय बाविस्कर , महेश म्हाञे , सुनिल चावके यांचे बरोबरच पियुष नासिककर हा युवा पञकार कवी संमेलनात रामदास फुटाणेंसोबत मराठी कवींचे प्रतिनिधित्व करणार आहे . अरूण जाखडे हे प्रकाशकांचे प्रतिनिधी असले तरी त्यांनी स्वतंञ लेखन संपादनही केले आहे . अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष वसंत आबाजी डहाके आणि डाॅसदानंद मोरे या संमेलनात सञाध्यक्षाच्या भूमिकेत आहे .श्रीपाल सबनीसांचीही सञाध्यक्ष म्हणूनही संमेलनात दखल घेतली गेली आहे . गोव्याचे कवी विष्णु सुर्या गुंजाळ , शिरीष नाईक हे अन्य मराठी वक्तेही सहभागी होणार आहेत .
गणेश देवी या संमेलनाचे अध्यक्ष आहेत . त्यांचे भाषेच्या क्षेञातले काम महत्वाचे आहे . घुमानच्या संमेलनातील त्यांची मुलाखत महत्वपूर्ण होती . भाषाविषयक महत्वपूर्ण कामगिरी करणारा भाषातज्ञ या संमेलनात बोलणार असल्याने या छोटेखाणी संमेलनात महत्वपूर्ण चर्चा अपेक्षित आहे . भाषिक आदानप्रदान मोठ्या प्रमाणावर घडत आहे . कोणतीच भाषा प्रदुषणापासून मुक्त नाही . मराठीतले कितीतरी शब्द अन्य भाषेत स्थिरावले आहेत . बाई आणि आई हे शब्द गुरुवाणीत असल्याचे डाॅ सदानंद मोरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातच सप्रमाण सिध्द केले आहे . काही मराठी शब्दांनी तर थेट ऑक्सफर्ड डिक्शनरीत स्थान मिळविले आहे . आज आपण बोलतो ती मराठी भाषाही आदानाने समृध्द झाली आहे . तंञज्ञानाने नवनवीन शोध लागत असून नव्या उपकरणासाठी परभाषेतून आलेला शब्द योजवा लागतो .तो भाषा स्वीकारतेसुध्दा .अशा भाषिक घुसळणीच्या काळात हे संमेलन होत आहे . साने गुरूजींची अंतरभारतीची कल्पना या संमेलनात दिसेल अशी आशा वाटते .
पंजाबमध्ये घुमानला होणा-या बहुभाषिक संमेलनात भाषा भगिनींची चर्चा होईलच पण या निमित्ताने तिथे पुढील काळात बहुभाषेच्या अभ्यासासाठी भाषाभवन उभारण्याची कल्पना पुढे आली आहे . भाषाविषयक संशोधनही त्यातून व्हावे अशी अपेक्षा आहे . भाषांतर , अनुवादाच्या क्षेञात साने गुरूजी राष्ट्रीय स्मारकानेही कोकणात काम सुरू केले आहे . ते देशपातळीवर घडण्याची चिन्हे घुमानला दिसत आहे . हे संमेलन प्रत्येक वर्षी घुमानला होणार आहे . संत नामदेवांमुळे घुमान पुण्यमूमी , तिर्थक्षेञ म्हणून परिचित होते . आता ते भाषा संवर्धन , संशोधनाचे केंद्र बनत आहे . महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृतीतून हा उपक्रम फळावा , फुलावा आणि मराठीचा झेंडा असाच फडकत रहावा , अशी अपेक्षा करू या .
डाॅ शंकर बो-हाडे
9226573791
No comments:
Post a Comment