युवा वाईन लेडी - श्रध्दा मोरे जागतिक स्तरावर लाईफटाईम जज
================%=======================
1980चे दशक नाशिक जिल्हयासाठी विशेष दशक मानावे लागते . शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहीजे यासाठी अभूतपूर्व आंदोलन सुरू झाले . या उग्र आंदोलनाचे पडसाद भारतभर उमटले .शरद जोशी यांच्या खांद्याला खांदा लावून माधव खंडेराव मोरे लढत होते . त्यांच्या बरोबर प्रल्हाद पाटील कराड , निफाड सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन चेअसमन माधवराव बोरस्ते होते . पैकी माधव खंडेराव मोरे यांनी शेतक-यांसाठी आंदोलनाबरोबरच विविध प्रयोग केले . एकदा ते नारायणगावला वाइन कंपनीला भेट देण्यासाठी गेले . कंपनीने भेट नाकारताच नाना कडाडले , " तुम्ही काय अॅटमबाॅम्ब तयार करीत आहात का ? एक दिवस व्यापारी माझ्या बांधावर वाइनची द्राक्ष खरेदी करायला येईल , तेंव्हा बांधाबांधावर वायनरी उभ्या दिसतील . " मोरे यांनी प्रथम द्राक्ष निर्यात करणारी कंपनी सुरु केली . त्यासाठी ख्रिस्तोफर या इंग्लंडच्या व्यापा-याकडून रितसर माहिती करुन घेतली . पुढील काळात त्यांनी पिंपेन इंडिया लि. ही कंपनी स्थापन केली . पिंपेन हा या शेतकरी नेत्याचा ड्रीम प्रोजेक्ट होता . 1988 मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीला दीर्घायुष्य लाभले नाही . पुढे 1992 मध्ये महाग्रेपची स्थापना माधव खंडेराव मोरे यांनी केली . महाग्रेप हे द्राक्ष उत्पादकांचे व्यासपीठ ठरले . नाना महाग्रेप मधून बाहेर पडले .पिंपेनलाही यश मिळाले नाही . पण नानांचे स्वप्न आणि शब्द नाशिक जिल्हयात शब्दशः खरे ठरले आहेत . विंचूरला वाईन पार्क उभा राहिला आहे . शॅपेन हे नाव गावावरून पडले . तसेच नाव पिपेन दिले गेले . पिंपळगावची सुरा म्हणून पिंपेन . विचुरची सुरा विंचुरा .विंचूरची विंचूरा , सुला या वाईन जगाच्या मार्केटमध्ये पोहचल्या आहेत . पिंपेन सुला वाईनने टेक ओव्हर केली .माधव खंडेराव मोरे यांनी वाईन पार्क मधला प्रोजेक्ट पिंपळगावला आपल्या बांधावर नेला . त्यांच्या सूनबाई सौ सुनंदा विश्वास मोरे या सायलो वाईनचे प्राॅडक्शनचे काम सांभाळीत असून त्या नाशिकच्या वाईनलेडी ठरल्या आहेत .तर नानांची नात श्रध्दा विश्वास मोरे या इंग्लंडमधले शिक्षण संपवून फ्रान्समध्ये पुढील शिक्षणासाठी गेली असून वाईनच्या जागतिक स्पर्धेसाठी जज म्हणून नियुक्त झाली आहे , एक मराठी मुलगी जागतिक स्पर्धेसाठी जज म्हणून निवडली जाणे हेच एक कौतुक आहे. पुण्याच्या गरवारे महाविद्यालयातून बी एस्सी ( बायोटेक )पदवी संपादन करणा-या श्रध्दा हिने वाईन उद्योगात करियर करण्याचा निर्णय घेतला असून आता तिने लाईफटाईम जज म्हणून मान्यता मिळविली आहे . फ्रान्स सरकारच्या Effervescence du Monde या संस्थेच्य वतीने वाईनचे जागतिक मानांकन करण्यासाठी परीक्षा घेतली जाते . या परीक्षेसाठी जगभरातून तज्ञ व्यक्ती सहभागी होतात . या स्पर्धेत पिंपळगावच्या भूमिकन्येने बाजी मारली आहे . सौ सुनंदा मोरे या श्रध्दाच्या आई . पिंपळगावला त्या मोरे यांच्या सायलो वाईनचे प्राॅडक्शन सांभाळतात . सुनंदा मोरे या उद्योगाशी विवाहानंतर जोडल्या गेल्या . सुनंदा मोरे यांचा विश्वास मोरे यांचेशी प्रेमविवाह झाला तरी त्या काही बंडखोर नव्हत्या. नात्याचा विचार करता नातं विवाहाला मान्यता देणारच होतं. मामाचीच मुलगी आणि ती ही बालमैञिण असल्याने विवाहाला अडचण नव्हती . विश्वास मोरे यांनी बायकोला आधीच सांगितले होते , " दोन मुलींनंतर आपण थांबायचे ." स्ञी जन्माचे स्वागत करा असे त्यांना कुणी सांगितले नव्हते .सौ. सुनंदा बी ए झाल्या आहेत . लग्नानंतर त्यांनी या उद्योगात लक्ष घातले . प्रत्यक्ष शेतीतला अनुभव नसताना त्या शेती पाहू लागल्या . माधव खंडेराव मोरे यांनी द्राक्षासाठी महाग्रेप हे व्यासपीठ निर्माण केले . विंचूरला वाईनपार्क उभा करण्यासाठी प्रयत्न केला . एका स्वप्नाचा पाठपुरावा करण्याचा माधवराव नाना यांचा प्रयत्न होता . त्याच वेळी विश्वास मोरे वसौ सुनंदा हे स्वतःचे प्राॅडक्ट डेव्हलप करीत होते . वाईन उद्योगाचा अभ्यास मोरे कुटूंबाने सुरू केल होता .सायलो हे नाव मुलीच्या नावावरुन ठरले . त्यांची कन्या सायली ही आज सी ए करते आहे . उत्तम चिजकार असणा-या सायलीच्या नावाचा ब्रॅड प्रसिध्द होऊ लागला आहे . बाराहजार लिटरची टाकी तयार झाली . वाईनचे उत्पादन सुरू झाल्यावर त्याचे ब्रॅडीगही करावे लागले . सायलो वाईनचे उत्पादन आज सिक्कीम भूतानपर्यंत गेले आहे . सायलो वाईनचे मदर युनिट पिंपळगाव ( ब ) मध्ये असले तरी त्याचा विस्तार सिक्कीम, भूतानपर्यंत पोहचला आहे . पुढील काळात हाॅगकाॅग शहरापर्यंत विस्तार करण्याचे नियोजन चालू आहे . 1998 साली वाईन पार्क सुरू झाला . विंचूराचे नाव सर्वदूर पोहचत असताना सायलोचे उत्पादन आस्ते पण दमदार वाटचाल करीत आहे . श्रध्दा विश्वास मोरे थेट इंग्लंडमध्ये वाईन उत्पादनाचे धडे घेऊन फ्रान्स मध्ये पोहचली आहे .तिथे माॅटपेले शहरातील गायझनहॅम विद्यापीठाच्या वेटीसी वेनेफेरा महाविद्यालयात शिकत असताना तिने EmaVE ही मानाची शिष्यवृत्ती मिळवली असून जगातील साठ देशातील शॅपेंन उत्पादकांचा सहभाग असलेल्या स्पर्धेत ती जज म्हणून निवडली गेली आहे . भारतातील पहिली व एकमेव जज असणारी श्रध्दा आता या उद्योगातील नाविन्यपूर्ण घडामोडी आपल्या उत्पादनासाठी कळवित असते . आता ती जगभर या उत्पादनात व उद्योगात चालणा-या घडामोडी टिपत आहे . एक खासा मराठा समाजातील ही कन्या क्रांतीकारक शेतकरी कुटूंबात वाढली . आता ती वाईन व शॅपेन उद्योगाच्या घडामोडींची साक्षीदार व लाईफ टाईम जज झाली आहे .
वाईन उद्योगासमोर आज विविध समस्या व आव्हाने आहेत . वाईन पार्क सुरू झाला तेंव्हा एक्कावन्न परवाने देण्यात आली . आज त्यातल्या काही वायनरी बंद पडल्या आहेत . काहींनी आक्रमक मार्केटींग केले . काही झगडत आहेत .कारण भारतात वाईन उत्पादनाच्या बाबतीत राज्यस्तरावर शासनाची भूमिका वेगवेगळया राज्यात वेगवेगळी आहे .केंद्रस्तरावर धोरण नसल्याने शासनाच्या नियम अटींचा फटका उत्पादकांना बसतो आहे .
शेतकरी संघटनेचे नेते माधव खंडेराव मोरे यांनी शेतक-याच्या बांधावर वाईनरीचे स्वप्न पाहीले आणि ते प्रत्यक्षात आले . सौ. सुनंदा व विश्वास मोरे यांनी त्या स्वप्नाचे प्रात्यक्षिक करून सिक्कीम, दार्जिलींग पर्यंत त्याचा विस्तार केला तर त्यांची कन्या या क्षेञातील लाईफ टाईम जज म्हणून जगभर पोहचली आहे . तिला उद्या सर्वचजण वाईनलेडी म्हणूनच ओळखतील अशी दमदार वाटचाल श्रध्दा विश्वास मोरे हिची सुरू आहे . ती बाईपणाच्या बुरख्यातून बाहेर पडून स्वतःची ओळख निर्माण करीत आहे .
प्रा डाॅ शंकर बो-हाडे
9226573791

No comments:
Post a Comment