वकीलांचे साहित्य संमेलन होऊ द्या
कालपरवाची गोष्ट. अॅड दौलतराव घुमरे यांच्या तीन पुस्तकांचे प्रकाशन होते . अडॅ घुमरे हे ज्येष्ठ विधीज्ञ. वयाच्या नव्वदीत त्यांनी आपले अनुभव संचित शब्दबध्द केले . लाॅयर हे त्यांचे आत्मकथन . प्रकाशन समारंभास अॅड धैर्यशील पाटील ,अॅड उज्वल निकम , न्या साधना जाधव असे दिग्गज होते . मराठी साहित्याच्या अंगणात हे सारस्वताचे झाड वाढविणारी वकील मंडळीही आहेत आणि त्यांनी साहित्यसेवा करून आपले योगदान मराठी साहित्याला दिले असे म्हटले तर ते अयोग्य ठरणार नाही . वकीलाला विविध कथांचा उलगडा होत असतो . डाॅक्टर माणसाचे वस्ञाविना शरीर पहात असतो . वकीलासमोर वस्ञाच्याआतील माणसाचे चरीञ आणि चारिञ्य येत असते . म्हणून वकीलाचे लेखन हे वास्तवाच्या पायावर उभे असते . मला वाटतं वकीलांनी मोठ्या संख्येने आपले अनुभव लिहीले तर मोठ्या अक्षर वाऽमय निर्माण होऊ शकते . वकीलांना घटनांचे कितीतरी पदर माहित असतात . अजून मानवी जीवनाचे खरे रहस्य साहित्यातही पुरते अवतरले नाही .
स्वातंञ्य चळवळीतले कितीतरी नेते कायद्याचे पदवीधर , द्वीपदवीधर होते . न्या महादेव गोविंद रानडे यांनी ग्रंथकार सभा भरवून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेड रोवली .मराठी सत्तेचा उदय हा त्यांचा महत्वपूर्ण ग्रंथ . लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांची शतपञे प्रसिध्द आहेत . ते कायदा क्षेञातच कार्यरत होते . बाळ गंगाधर टिळक हे वकीलीची परीक्षा पास होऊन भारतीय असंतोषाचे जनक ठरले . स्वातंञ्यवीर सावरकर हे ही बॅरिस्टर होऊन स्वातंञ्य लढ्याचे नेतृत्व करीत होते . मोहनदास करमचंद गांधी हे बॅरिस्टर होऊनच भारतात आले आणि स्वातंञ्य लढ्याचे नेतृत्व करू लागले . डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी कितीतरी खटल्यात बाजू मांडली . फाळणीपूर्व अखंड हिंदुस्थानचे नेते महमद अली जीना हे बॅरिस्टरच होते . यांनी चळवळीचे साधन म्हणून साहित्याकडे पाहीले . लोकमान्य टिळक यांनी केसरी , मराठा या वृत्तपञातून अग्रलेख लिहून सरकारचे स्वरुप विस्तारण केले . मंडालेच्या तुरुंगात असताना " गीतारहस्य " हा ग्रंथ लिहीला .गांधीजींनी यंग इंडिया , हरिजन मधून लिहीले . डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक , बहिष्कृत भारत या पञांबरोबरच स्वतंञ ग्रंथसंपदाही निर्माण केली . पं जवाहरलाल नेहरू यांचा " भारताचा शोध " हा मूलभूत ग्रंथ ठरला . काॅग्रेसचे त्तकालिन नेते न. वि. तथा काकासाहेब गाडगीळ हे प्रवासवर्णनकार म्हणूनही प्रसिध्द आहेत . ही सर्व मंडळी कायदा क्षेञातली होती . काहींनी वकीलीची सनद घेउनही वकीली केली नाही . डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी माञ बाह्मणेतर चळवळीतील जेधे-जवळकर , र.धो.कर्वे यांच्या खटल्यात वकीली केली . तरी त्यांच वैचारिक वाऽमयाच्या क्षेञातील स्थान अव्वल दर्जाचेच मानावे लागते . टिळक - आंबेडकर यांच्याशिवाय स्वातंञ्य लढयाचा आणि प्रबोधनाच्या चळवळीचा तसेच वाऽमयाचा इतिहास लिहीला जावू शकत नाही . स्वातंञ्यपूर्व काळातील वकीलांच्या साहित्याचे प्रयोजन स्वातंञ्य लढा , समाज परिवर्तन असे होते . ते साहित्य ललित आणि दलित असे दोन्ही नव्हते . चळवळीचे साधन होते . बी. सी. कांबळे यांनी त्याच न्यायाने डाॅ आंबेडकरांचे चरीञ खंड लिहीले . आधुनिक मराठी साहित्याचा हा पूर्वकाळ होता .
खरं तर तज्ञ वकीलांनी केलेले लेखन हे कायदा क्षेञाविषयी आणि इंग्रजी या भाषिक माध्यमातून . या पुस्तकांची मराठी भाषांतरेही झाली . त्यांना विविध मानसन्मानही मिळाले . वुई दी पिपल हे न्या छगलांचे पुस्तक महत्वपूर्ण ठरते. कायदा क्षेञात वकील , न्यायधीश यांनी साहित्याच्या क्षेञात महत्वपूर्ण भर घातली आहे कायद्याचा.अन्वयार्थ स्पष्ट करणारी , एखाद्या वेगळया केसचा पैलू स्पष्ट करणारी आंग्ल भाषेतील ही पुस्तके रूपांतरित होऊन मराठीत आली आहेत . अलिकडील भास्करराव आव्हाड , काका घुगे , दौलतराव घुमरे यांची ग्रंथ संपदा हे याचे उदाहरण ठरावे .सातारच्या धैर्यशील पाटलांच्या " ओल्ड वर्ल्ड , न्यू होरायझन्स " या पुस्तकाला नेहरू पारितोषिकही मिळाले आहे . मिस रूल ऑफ लाॅ ,मिस युज ऑफ लाॅ , ही काका घुगे यांची पुस्तके प्रसिध्द आहेत . भास्करराव आव्हाड यांचे वैदीक न्यायशास्ञावरील पुस्तक मराठीत आले आहे .
आधुनिक मराठी साहित्यात भाऊसाहेब पाटणकरांच्या गझला प्रसिध्द आहेत . पुन्हा एकदा हा धैर्यशील पाटील यांच कविता संग्रह तर दलित कवी अशोक बनसोडे यांचा माझ्या बापाचा बाप संग्रह वकील कवीही आहेत याचा पुरावा मानावा लागतो . शंकरराव खरातांचे तराळ अंतराळ हे आत्मकथन प्रसिध्द आहे . कथाकार , कादंबरीकार असणा-या शंकरराव खरातांनी जळगावच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थानही भूषविले आहे . बाबा कदम हे लोकप्रिय कादंबरीकार . वाचनालयात त्यांच्या कादंब-या वाचनासाठी प्रतिक्षायादी असायची . ते ही वकीलांचेच प्रतिनिधी . बाळासाहेब भारदे हे विधानसभेचे सभापती असले तरी संत साहित्यावर त्यांनी ग्रंथ लेखनही केले आहे . रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष पद भषविलेल्या रावसाहेब शिंदे यांचे ध्यासपर्व हे आत्मकथन . त्यांनी भावलेली माणसं या शीर्षकाने व्यक्तीचिञेही लिहीलेली आहेत . त्यांच्या पञलेखनाचे संवाद पर्व खंडात्मक रुपात प्रसिध्द आहे . काकासाहेब कालेलकरांनंतर प्रवास वर्णन लिहीणारे लेखक भास्करराव आव्हाड . त्यांची क्षितिजापार , कोलंबसाचा मागोवा , शोध कांगारूंचा ही प्रवास वर्णने पसिध्द आहेत . त्यांनी प्रसंगाप्रसंगाने लिहीलेल्या स्फुट लेखनातून पंचनामा , विविधा -एक, दोन असे संग्रह पसिध्द झाले आहेत . मरूद्यान , उद्यानविश्व असे कविता संग्रह लिहीणारे ज्येष्ठ विधिज्ञ आव्हाड महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विश्वस्थ मंडळाचे अध्यक्षही आहे.
वकीलांची ज्येष्ठ पिढी आज व्यवसायातून बाहेर पडत असताना आठवणी , अनुभवकथन , आत्मकथा लिहीत आहे . गंगाजल - अॅड खुटाडे , जमनादास आहुजा - पंख नियतीचे, माझ्याचसाठी जन्मलो न मी - सुदाम भागुजी ( दाजी ) सांगळे यांनी आपल्या आत्मकथा लिहून प्रसिध्द केल्या आहेत . नव्या पिढीला या आत्मानुभवातून बोध होतो . वकीलीचा व्यवसाय तरुण वयात वाट पहायला लावणारा तर वय वाढत असताना कामाचा व्याप वाढवणारा . वकीलाला सेवानिवृत्ती नसते . म्हणून नव्वदीतही कोर्टात लक्ष घालणारे वकील सापडतात . त्यातल्या काहींनी आता हे अनुभवसंचित शब्दबध्द करायला सुरुवात केली आहे . मराठी साहित्य समृध्दीला वकीलांचाही हातभार लागतो आहे , हे सुचिन्ह . आता वकीलांचे साहित्य संमेलन व्हावे , असे म्हटल्यास ते फार कल्पनाविलासाचे ठरणार नाही .
प्रा डाॅ शंकर बो-हाडे
9226573791